दिव्यांग बांधवांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहू नये--जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारदिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती कार्यशाळा
दिव्यांग बांधवांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहू नये --जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती कार्यशाळा धाराशिव (जिमाका), दि.१० डिसेंबर : दिव्यांगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय असणे आवश्यक आहे. दिव्यांग हक्क अधिनियम हा कायदा देखील आहे. या कायद्याने त्यांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य हे निश्चित केले आहे. दिव्यांग बांधव हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळवून देताना त्यांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ कलम ३९ अन्वये दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून श्री. पूजार बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील, केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण समितीचे सदस्य सुरेश पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, निवासी उपजिल्ह...