*राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी मंजुषा साखरे यांना उमेदवारी; प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल*
*राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी मंजुषा साखरे यांना उमेदवारी; प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल*
धाराशिव: धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP) आपला उमेदवार निश्चित केला आहे. पक्षाकडून मंजुषा विशाल साखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मंजुषा साखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धूरगुडे आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपला अर्ज सादर केला. यावेळी प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, जिल्हा प्रवक्ता ॲड.विशाल साखरे, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जाधव, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अराफत काझी यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.