धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?
धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,
राहुल कोरे आळणीकर धाराशिव -जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आज झालेल्या विशेष सभेत चार महत्त्वाच्या सभापती पदांची निवड जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये सत्ता वाटप करताना ‘संतुलन’ साधण्याचा प्रयत्न दिसला असला तरी, अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
समाजकल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे (भाजप), कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खराडे (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापतीपदी पूजा शिंदे (शिवसेना) आणि अर्थ व बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे (भाजप) यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे महायुतीतल्या सत्तेचा तोल साधण्याचा प्रयत्न झाला असला, तरी स्थानिक पातळीवर नाराजीचे सूर उमटत आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही काही इच्छुकांना डावलल्याची चर्चा रंगली आहे. “पद वाटप पारदर्शक नाही, फक्त राजकीय समीकरणे जपली जात आहेत,” असा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद सभापतीसाठी संजय काका लोखंडे यांचे नाव चर्चेत होते येडशी येथे कार्यकर्त्यांनी जल्लोषात गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला बॅनर लावण्यात आले परंतु असे काय झाले की त्यांचे नाव कट करण्यात आले त्यामुळे सोशल मीडियावर व भाजपाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. लोखंडे हे राणा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात आहे परंतु त्यांचे सभापतीपद कोणी कट केले याचा संभ्रम निर्माण होत आहे. महेंद्र काका धुरुगुडे यांचे नाव उप अध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत होते परंतु धुरगुडे यांनी त्यास नकार दिला. परंतु त्यांना सभापती पद भेटेल अशी आशा होती परंतु तेही त्यांच्या नशिबी मिळाले नाही. विशेष म्हणजे अध्यक्ष व उपाध्यक्षासाठी महिंद्र काका धुरगुडे यांचे मोठे योगदान लाभले आहे.
विशेष म्हणजे, महाविकास आघाडीनेही सभापती पदांसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र मतदान प्रक्रियेत महायुतीच्या उमेदवारांनी ४५ ते ७० मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.
जनतेचा सवाल:
“ही पदवाटप विकासासाठी की फक्त राजकीय तडजोडीसाठी?”
आगामी काळात या नव्या टीमकडून खरोखरच विकासकामांना गती मिळणार का, की फक्त सत्तेचा खेळ सुरू राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.