मौजे आळणी ता.जि. धाराशिव शिवारातील शेतरस्ते / पाणंद रस्ते रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरणाची प्रलंबित कामे लवकरात लवकर करा शेतकऱ्यांची मागणी
मौजे आळणी ता.जि. धाराशिव शिवारातील शेतरस्ते / पाणंद रस्ते रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरणाची प्रलंबित कामे लवकरात लवकर करा शेतकऱ्यांची मागणी
1) जुना गडवाट रस्ता
2) खेडवाट पाणंद रस्ता (पुर्वेकडील आळणी खेड साठवण तलाव अंतर्गत रस्ता)
3) ढोकीवाट पाणंद रस्ता
4) फुगारेवस्ती - देशमुखवस्ती शेत रस्ता
5) काशीमाळी पाणंद रस्ता
6) जुना जवळारोड पाणंद रस्ता
7) विमानतळ रोड ते स्वधार मतीमंद
योजनाव्दारे मंजुरी मिळालेली आहे. परत या रस्त्यांच्या रुंदीकरण दुरुस्ती तथा मजबुतीकरण निधीच्या कमतरतेमुळे व शासन स्तरावरील इतर तांत्रीक अडचणीमुळे या रस्त्यांची कामे गेली कित्येक वर्षापासुन प्रलंबित आहे.
वास्तविक सदरील शेत रस्त्यांच्या व पाणंद रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे मौजे आळणी गावातील आम्हा शेकडो शेतकऱ्यांच्या दैनंदीन येण्या जाण्याचा, शेतमाल वाहतुकीचा व शेतीच्या मशागीतचा गंभीर प्रश्न वर्षानुवर्ष दुर्लक्षीत राहिलेला आहे. तसेच खरीप हंगामातील पिक काढणी झाल्यानंतरची मळणी, तयार शेतमाल वाहतुक, रब्बी हंगामाच्या शेतीच्या मशागतीचे कामे व ऊसपिक वाहतुकीसाठी रस्ता असणे अत्यंत आवश्यक आहे.
तरी आपण आम्हा शेतकऱ्यांच्या अडचणी समजुन घेण्यासाठी व्यक्तीशः भेट देऊन वस्तुस्थिती जाणुन घ्यावी. व येत्या पावसाळ्यापुर्वी प्रलंबित शेत रस्त्याची / पाणंद रस्त्याची कामे पुर्ण होण्यासाठी व शेतकऱ्यांची रस्त्याची अडचण कायमस्वरुपी दुर होण्यासाठी योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करुन आम्हा शेतकऱ्यांना सहकार्य करावे ही नम्र विनंती.
मौजे.आळणी,ता.धाराशिव येथील शेतरस्ते / पानंद रस्त्यांची रुंदीकरण,दुरुस्ती तथा मजबुतीकारणाची प्रलंबित कामे लवकरात - लवकर पूर्ण करण्यात यावी यासंदर्भात मा.किर्ती किरण पुजारसाहेब,जिल्हाधिकारी - धाराशिव यांना आज आळणी गावातील शेतकऱ्यांतर्फे भेटून निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित सुधाकर ( बुबा ) कदम,साहेबराव कदम,कृष्णा गाडे ( उपसरपंच ),अभयसिंह वीर,विकास पाटील,प्रदीप माळी,भालचंद्र तौर,स्वप्नील देशमुख,संदीपराजे वीर,सुधीर देशमुख,तानाजी चौगुले इ.