परंडा तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे निवेदन; महागाई, बेरोजगारी व मतदार यादीतील त्रुटींवर तातडीच्या कारवाईची मागणी
- Get link
- X
- Other Apps
परंडा तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे निवेदन; महागाई, बेरोजगारी व मतदार यादीतील त्रुटींवर तातडीच्या कारवाईची मागणी
परंडा (धाराशिव) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या तालुकानिहाय जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज परंडा तहसील कार्यालयात तहसीलदारांना विविध लोकहिताच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महागाई, वाढती बेरोजगारी, डिझेल दरवाढ, पेपरफुटी तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) आणि मतदार यादीतील त्रुटी यांसारख्या गंभीर विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष किरण कराळे, जिल्हा सचिव सुवास ठोंगे, शहराध्यक्ष शहाबर्फीवाले सर, युवक तालुका अध्यक्ष प्रवीण गरड, शिवाजी गायकवाड, जिल्हा संघटक अमोल सुरवसे, दशरथ चाबुकसवर, सज्जन गोडगे, तालुकाध्यक्ष कुंभार साहेब, माजी सैनिक हनुमंत चव्हाण, अब्दुल पटेल, कल्याणराव थिटे, मारुती कांबळे, दादासाहेब केमदारने, महावीर महाराज, ऋषिकेश पाटील, अनिल नाईकवाडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून न्याय द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps