धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ, धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट? राहुल कोरे आळणीकर धाराशिव -जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आज झालेल्या विशेष सभेत चार महत्त्वाच्या सभापती पदांची निवड जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये सत्ता वाटप करताना ‘संतुलन’ साधण्याचा प्रयत्न दिसला असला तरी, अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. समाजकल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे (भाजप), कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खराडे (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापतीपदी पूजा शिंदे (शिवसेना) आणि अर्थ व बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे (भाजप) यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे महायुतीतल्या सत्तेचा तोल साधण्याचा प्रयत्न झाला असला, तरी स्थानिक पातळीवर नाराजीचे ...