बालकामगारांना कामावर ठेवणाऱ्यांचा खैर नाही! धाराशिवमध्ये धडक कारवाई; बेकरीत आढळले दोन किशोरवयीन कामगार

बालकामगारांना कामावर ठेवणाऱ्यांचा खैर नाही! धाराशिवमध्ये धडक कारवाई; बेकरीत आढळले दोन किशोरवयीन कामगार


धाराशिव (प्रतिनिधी) : बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवणाऱ्या आस्थापनांवर कामगार विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, विशेष अभियानांतर्गत धाराशिव शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व निर्मूलन) अधिनियम 1986 तसेच सुधारित अधिनियम 2016 अंतर्गत विशेष बालकामगार व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. नितीन पाटणकर, कामगार उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या निर्देशानुसार तसेच गोविंद गावंडे, सरकारी कामगार अधिकारी, धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या अभियानादरम्यान धाराशिव शहरातील समर्थ नगर परिसरातील बेंगलोर बेकरीच्या गोडाऊनची तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी तेथे दोन किशोरवयीन कामगार काम करत असल्याचे आढळून आले. संबंधित किशोरवयीन कामगारांना पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित आस्थापना मालकाविरुद्ध विविध कामगार कायद्यांनुसार निरीक्षण शेरा नोंदविण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सचिन अरबट, दुकाने निरीक्षक तथा सरकारी कामगार अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत नितीन गोरे (लिपिक), वैभव गोरे, शरद ढवळे यांच्यासह जिल्हा महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी अभय काळे, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
बालकामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे कामगार विभागाने स्पष्ट केले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक