थेट दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेणाऱ्या दोघांवर ५ वर्षांची मंदिर प्रवेशबंदी

थेट दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेणाऱ्या दोघांवर ५ वर्षांची मंदिर प्रवेशबंदी

धाराशिव प्रतिनिधी -३ जून रोजी साम टीव्ही या मराठी वृत्तवाहिनीवर श्री तुळजाभवानी मंदिरातील काही पुजाऱ्यांकडून भाविकांची थेट दर्शनाच्या नावाखाली पैसे घेऊन लूट होत असल्याबाबचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने तात्काळ कारवाई करत अभिषेक अशोकराव साळुंखे आणि हर्षल विनोद चव्हाण या दोघांना ५ वर्ष मंदिर प्रवेश बंदी घातली आहे. या कालावधीत संबंधित व्यक्तींना पुढील पाच वर्ष मंदिरामध्ये प्रवेश करता येणार नाही. तसेच या दोघांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तुळजापूर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले आहे.
भाविकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये तसेच भाविकांचे धार्मिक विधी व पूजा अधिकृत पुजाऱ्याकडूनच व्हावी, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने अनधिकृत पूजारी व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. हे पथक मंदिर परिसरात नियमित पाहणी करून अनधिकृत काम करणाऱ्यांवर लक्ष ठेवत आहे.
भाविकांची फसवणूक करणे, दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे घेणे अथवा मंदिराच्या अधिकृत व्यवस्थेबाहेर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत काम करणे अशा प्रकारांवर भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येणार असून भाविकांनी दर्शनासाठी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला पैसे देऊ नयेत, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक