आशाताई हंबीरे यांचे निधन

आशाताई हंबीरे यांचे निधन 
धाराशिव प्रतिनिधी 
आशाताई हंबीरे यांचे रविवारी दिनांक ०७/०६/२०२६रोजी. दुपारी २.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्या 83 वर्षे वयाच्या होत्या दैनिक संघर्ष चे संस्थापक संपादक व्यंकटेश हंबीरे यांच्या त्या पत्नी होत्या तर त्यांचे  संपादक संतोष हंबीरे,रमण हंबीरे,अभय हंबीरे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दिनांक०८/०६/२६ रोजी सकाळी अकरा वाजता कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 
धाराशिव शहरातील जुन्या काळातील प्रसिद्ध व्यापारी पांडुरंग गोवर्धन यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या तर हंबीरे कुटुंबीय त्यांनी कुटुंब प्रमुख या नात्याने जबाबदारी पार पडली त्यांचा स्वभाव बोलका असल्याने त्या सर्वत्र परिचित होत्या वृद्धाप काळाच्या आजारपणामुळे पाच दिवसापूर्वी त्यांना त्यांचे चिरंजीव संतोष हंबीरे यांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते शनिवारीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला मात्र रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात नातू आदित्य, यश 
दीर:- डॉ गोपाल, मुरलीधर, 
पुतणे:- डॉ श्रीनिवास, गिरीष 
असा मोठा परिवार आहे

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक