तुळजाभवानी मंदिरातील शहाजीराजे महाद्वार सर्व भाविकांसाठी खुले करण्याची मागणीसिद्दिक (गोलाभाई) शेख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तुळजाभवानी मंदिरातील शहाजीराजे महाद्वार सर्व भाविकांसाठी खुले करण्याची मागणी
सिद्दिक (गोलाभाई) शेख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशभरातून तसेच विविध धर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने तुळजापूर येथे येत असतात. सध्या व्हीआयपी पासधारक आणि सिंहासन पूजा करणाऱ्या भाविकांना शहाजीराजे महाद्वारातून प्रवेश दिला जात आहे. मात्र सर्वसामान्य भाविक, वृद्ध महिला, अपंग व्यक्ती, लहान मुलांसह येणारे कुटुंबीय यांना या मार्गाचा लाभ मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याची बाब समोर आली आहे.
यासंदर्भात सिद्दिक (गोलाभाई) इब्राहिम शेख यांनी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांना निवेदन देऊन शहाजीराजे महाद्वार सर्व भाविकांसाठी खुला करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून भाविकांना महाद्वारातून दर्शनाची सुविधा उपलब्ध होती. तसेच कल्लोळ तीर्थाचे दर्शन घेऊन देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनाही याचा लाभ होत होता. मात्र सध्या काही विशिष्ट वर्गालाच महाद्वारातून प्रवेश दिला जात असल्याने इतर भाविकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. एकाच देवीच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये भेदभाव होणे योग्य नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, महाद्वार बंद असल्यामुळे परिसरातील व्यापारी वर्गालाही आर्थिक फटका बसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भाविकांच्या सोयीसाठी तसेच धार्मिक आणि सामाजिक समतेच्या दृष्टीने शहाजीराजे महाद्वारातून दर्शनासाठी प्रवेश खुला करण्यात यावा, अशी मागणी सिद्दिक (गोलाभाई) शेख यांनी केली आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक