धाराशिव – लातूर – बीड जिल्हयातील महायुतीच्या नेत्यांची मोठी उपस्थिती
धाराशिव – लातूर – बीड जिल्हयातील महायुतीच्या नेत्यांची मोठी उपस्थिती
धाराशिव / प्रतिनिधी विधान परिषदेच्या धाराशिव – लातूर – बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून बसवराज पाटील यांनी आज सोमवारी धाराशिव जिल्हयाचे जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यानंतर पत्रकारांशी सवांद साधताना उमेदवार बसवराज पाटील यांनी सांगितले की , केंद्रातील व राज्यातील सरकारने विकासासाठी घेतलेले निर्णय, राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य हे निश्चितच प्रेरणादायी आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत आहे, तर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेने अधिक वेगाने पुढे जात आहे.या निवडणुकीच्या माध्यमातून धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न, विकासकामे आणि जनतेच्या अपेक्षा प्रभावीपणे मांडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, आमदार विक्रम काळे, माजी खासदार मा. सुनील गायकवाड, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार दिनकर माने, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, मुरूमचे नगराध्यक्ष मा. बापूराव पाटील, प्रदेश उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अफसर शेख, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश सचिव राहुल केंद्रे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे , अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, धाराशिव माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, लातूर माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, उमरगा जनता बँकेचे अध्यक्ष शरण पाटील,परीक्षित पवार, श्री. राहुल केंद्रे, आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रकाश आष्टे, औसा माजी नगराध्यक्ष शिरीषप्पा उटगे, औसा माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.