*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव सेवकांचा सामाजिक उपक्रम.. मतिमंद स्वधार बालकांना शैक्षणिक साहित्य व खाऊ देऊन साजरा करण्यात आला उत्सव..*
*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव सेवकांचा सामाजिक उपक्रम.. मतिमंद स्वधार बालकांना शैक्षणिक साहित्य व खाऊ देऊन साजरा करण्यात आला उत्सव..*
धाराशिव : लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त धाराशिव सेवकच्या वतीने मतिमंद स्वधार बालगृह धाराशिव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.प्रथमता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले,समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करत बालगृह मधील सुव्यवस्था व मतिमंद मुलांच्या सुरक्षा,स्वच्छता व इतर बाबी पाहता संचालक मंडळ,शिक्षक,कर्मचारी यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या,यावेळी धाराशिव सेवकचे संस्थापक अध्यक्ष विवेक यादव,सामाजिक कार्यकर्ते तथा तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती सदस्य गणेश वाघमारे,भगतसिंग अभ्यासिकेचे विजय राठोड,दिनेश देवकते, प्रकाश चव्हाण तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकातील अहिल्याबाई होळकर स्मारकास अभिवादन करण्यात आले.