धाराशिवमध्ये अवैध मुरूम वाहतुकीवर महसूल विभागाचा दणका!नायब तहसीलदार विशाखा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली 10 टायर हायवा जप्त..
धाराशिवमध्ये अवैध मुरूम वाहतुकीवर महसूल विभागाचा दणका!
नायब तहसीलदार विशाखा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली 10 टायर हायवा जप्त..
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारे 10 टायर हायवा वाहन पकडून जप्त केले आहे. ही कारवाई नायब तहसीलदार विशाखा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव तालुका गौण खनिज भरारी पथकाने खानापूर (ता. धाराशिव) परिसरात केली...
मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर हद्दीत अवैधरित्या मुरूम वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने तत्काळ छापा टाकला. यावेळी आवश्यक परवानग्या व कागदपत्रांशिवाय मुरूम वाहतूक करणारे 10 टायर हायवा वाहन आढळून आले. त्यानंतर वाहन ताब्यात घेऊन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली...
या कारवाईत मंडळाधिकारी श्री. गुळमिरे, सय्यद सरवर, ग्राम महसूल अधिकारी राजेश पडवळ, सतीश निंबाळकर, राम गुट्टे, विशाल फासे तसेच महसूल सेवक श्रीकांत शेवाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
जप्त करण्यात आलेले वाहन पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आले असून महसूल विभागाकडून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे...
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू ठेवणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे....
➡️ अवैध मुरूम वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई ➡️ खानापूर येथे 10 टायर हायवा जप्त; तहसील कार्यालयात वाहन जमा ➡️ नायब तहसीलदार विशाखा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाची कारवाई ➡️ अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात प्रशासनाचा कडक संदेश