“महागाईची भेट – Melody चॉकलेट थेट.!!”
राहुल कोरे आळणीकर
महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढ, वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात धाराशिव युवक काँग्रेसकडून अनोखे आंदोलन..
🔸प्रदेशाध्यक्ष मा. शिवराजदादा मोरे यांच्या आदेशानुसार धाराशिव तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल पंपावर नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटप करुन असंवेदनशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यात आला.
🔸देशातील सर्वसामान्य जनता महागाईच्या झळा सहन करत असताना पंतप्रधान मात्र परदेश दौरे आणि रिल्स बनवण्यात व्यस्त आहेत. हा देशातील १४० कोटी जनतेचा अपमान असून अशा असंवेदनशील पंतप्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
🔺या आंदोलनात युवक प्रदेश सचिव धवलसिंह लावंड, धाराशिव तालुकाध्यक्ष संकेत पडवळ, उदगीर तालुकाध्यक्ष विवेक जाधव, विशाल घोडके, चैतन्य सुपेकर, महेबूब शेख, संतोष गायकवाड, मारुती बर्वे, रामकृष्ण घायाळ, हर्षवर्धन चोरमले तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.