*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची यशस्वी झेप; दहावीतील गुणवंतांचा लोमटे यांच्या वतीने सत्कार*

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची यशस्वी झेप; दहावीतील गुणवंतांचा लोमटे यांच्या वतीने सत्कार*
धाराशिव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. धाराशिव तालुक्यातील भाई उद्धवराव पाटील हायस्कूल तुगाव येथील दहावी परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चमकदार उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सचिन लोमटे दांपत्याकडून सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांचे आई-वडील उपस्थित होते. यामध्ये कु. क्रांती दत्तात्रय भुतेकर यांनी 95.60% गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले, तर कु. श्रेयश संतोष गडकर यांनी 94.60% गुण मिळवून गावाचे नाव अभिमानाने उंचावले. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले.

विद्यार्थिनी कु. क्रांती भुतेकर यांच्या आई सदगुरु इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून गावामध्ये विद्यार्थ्यांना क्लासेस घेऊन अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा दिली, मात्र स्वतःची मुलगी दहावी परीक्षेत प्रथम आल्याचा आनंद त्यांच्यासाठी विशेष ठरला. 

गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिसरातून गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक