अहिल्यादेवी होळकर यांच्या कामातून प्रेरणा मिळते-आमदार राणाजगजितसिंह पाटील

अहिल्यादेवी होळकर यांच्या कामातून प्रेरणा मिळते-आमदार राणाजगजितसिंह पाटील
राहुल कोरे आळणीकर 

धाराशिव -अहिल्यादेवी होळकर यांनी देश धर्म आणि माता-भगिनी यांच्या विकासासाठी फार मोठे कार्य केले आहे त्यांच्या या कार्यातून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते असे प्रतिपादन मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केले धाराशिव शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात होळकर यांच्या  301व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते याप्रसंगी आमदार पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर चौकात रीतसर परवानगी घेऊन नियमाप्रमाणे  अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णकृती पुतळा उभा करूत त्याचप्रमाणे होळकर चौकाचा चांगल्या पद्धतीने विकास करून ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यात येतील असे आमदार पाटील यांनी सांगितले पुढे बोलताना आमदार पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे त्याच पद्धतीने समाजातील महिलांना पशु उद्योगासाठी सहकार्य केले जाईल तर सुशिक्षित मुलींना सिम्बॉयसिस सारख्या चांगल्या संस्थेचे प्रशिक्षण देऊन चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी दिली जाईल यासाठी प्रयत्न केले जातील असेही आमदार पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी नगराध्यक्ष नेहा काकडे माजी नगराध्यक्ष अमित शिंदे भारत डोलारे एडवोकेट खंडेराव चौरे गणेश सोनटक्के नगरसेवक सर्वश्री इंद्रजीत देवकते राहुल काकडे राजकन्या अडसुळ सतीश कदम  दत्ता सोनटक्के संतोष वतने  पत्रकार राजाभाऊ वैद्य डॉ. गोविंद कोकाटे अहिल्या सखी मंचच्या डॉ. शैलजा कुलकर्णी अड.जयश्री तेरकर उषा लांडगे दिनेश बंडगर प्रा. सोमनाथ लांडगे तानाजी  तेरकर आदी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक