तेजस्विनी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

*तेजस्विनी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
धाराशिव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. विविध शाळांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले. अनेक शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. प्रसाद कॉलनी माणिक चौक धाराशिव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तेजस्विनी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्षा नंदाताई पुनगडे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी कु.यशराज तुकाराम मुळे (94%) कु. श्रेयश बबन कांदे (92.20%) यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

 गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी खचून जाऊ नये प्रत्येक अपयश हे नविन संधी घेऊन येते. असे मत पुनगडे मॅडम यांनी व्यक्त केले. व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून संस्थेच्या वतीने पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे आई-वडील उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक