*भाजपा महिला मोर्चाच्या वतीने अर्चना पाटील चाकूरकर यांचा सत्कार*

*भाजपा महिला मोर्चाच्या वतीने अर्चना पाटील चाकूरकर यांचा सत्कार*
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव:- धाराशिव "संघटन प्रवास" दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा कार्यकारणी बैठकीचे आयोजन धाराशिव येथे करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश याच्यावतीने धाराशिव जिल्हा प्रभारी व भाजपा प्रदेश उपाध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर धाराशिव येथे प्रथमच आल्या असता त्यांचा महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी निवडणुकांची तयारी, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी आपल्या अनुभवांचे मांडणी करत पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा, संघटन विस्तार आणि तळागाळातील कार्य अधिक प्रभावी करण्याचा संकल्प करण्यात आला. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळाली.

 या सत्कार प्रसंगी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिती कदम, पंचायत समिती सभापती गोकर्णा कदम, जिल्हा सरचिटणीस अस्मिता कांबळे, जिल्हा उपाध्यक्षा नंदाताई पुनगडे, जिल्हा चिटणीस अंजली बेताळे, आशाताई लांडगे,मंडळ अध्यक्षा रंजना राठोड, शहर मंडळ अध्यक्ष निशिगंधा पाटील, नगरसेविका अल्का पारवे, राणीताई पवार, दीपाली पाटील,सोशल मीडिया संयोजक विद्या माने,मा. सरचिटणीस युवा मोर्चा शिवानी परदेशी, उज्वला पाटील, सिमा वाकुरे, देवकन्या गाडे,महिला मोर्चातील पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक