*स्त्री जन्माचे स्वागत करुन अनोखी परीचा वाढदिवस साजरा..* प्रत्येक जन्माला येणाऱ्या कन्यारत्नाचे स्वागत झाले पाहिजे.. अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान.
*स्त्री जन्माचे स्वागत करुन अनोखी परीचा वाढदिवस साजरा..* प्रत्येक जन्माला येणाऱ्या कन्यारत्नाचे स्वागत झाले पाहिजे.. अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान.
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव :- शासकीय महिला रुग्णालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्ते तथा सदस्य सुरक्षा समिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव गणेश रानबा वाघमारे यांची मुलगी अनोखी परी हिचा वाढदिवस स्त्री जन्माचे स्वागत करुन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला, गेल्या दहा वर्षांपासून या उपक्रमात बेटी बचाओ बेटी पढाओ स्त्री भ्रूणहत्या रोखूया स्त्री जन्माचे स्वागत करुया या सदराखाली कन्यारत्न जन्मलेल्या बाळाला कपडे व बाळाच्या मातेला साडी गुलाब पुष्प देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्यात येते, आजच्या कार्यक्रमात एकुण सत्ताविस बाळांना कपडे व बाळाच्या मातेला साडी गुलाब पुष्प मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले,कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करुन करण्यात आले,मुलगी जन्मानंतर नकारात्मक दृष्टीने न पाहता सकारात्मक दृष्टिने पहावे,एक मुलगी अनेक नात्यांना जोडते,तिच्या जन्माचे स्वागत करा,तिला शिकवा, तिचा सन्मान करा हिच भावना जोपासत आज दहा वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत असलेले गणेश वाघमारे हा संदेश या कार्यक्रमातुन सातत्याने देत आहेत,तर प्रत्येक कन्यारत्न जन्मलेल्या बाळाचे स्वागत झाले पाहिजे असे मनोगत व्यक्त करत अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांनी अनोखी परीला शुभेच्छा दिल्या, डॉ स्मिता गवळी यांनी देखील परिला शुभेच्छा देत शिक्षण घेण्यावर भर दिला, डॉ.संजय नलावडे, डॉ.राहुल वाघमारे, अब्दुल लतीफ सदस्य सुरक्षा समिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव यांनी स्त्री जन्माचे स्वागत करुन परीला शुभेच्छा दिल्या.रुग्णालयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्टाफ नर्स वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, इन्चार्ज सिस्टर निर्मला भालेराव यांनी वाढदिवसाचे काव्य गीत गाऊन परिला शुभेच्छा दिल्या तर रौफ शेख यांनी शेरोशायरी तुन शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान, वैद्यकीय अधिक्षक डॉ स्मिता गवळी, डॉ संजय नलावडे, डॉ.राहुल वाघमारे,अब्दुल लतीफ सदस्य सुरक्षा समिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव,गणेश वाघमारे,सदस्य सुरक्षा समिती, बाबासाहेब जावळे सदस्य सुरक्षा समिती,संजय गजधने जिल्हाध्यक्ष जिल्हा ग्राहक आधार संघटना धाराशिव,रौफ शेख आरोग्य मित्र,बलभीम कांबळे आदर्श शिक्षक,सेवानिवृत्त तुळजापूर,किसन घरबुडवे परीचे आजोबा,श्रीकांत गायकवाड पत्रकार,विशाल घरबुडवे,आयुष वाघमारे,अनुष वाघमारे,अनुरथ गजधने,अनोखी परी वाघमारे,संबोधी गायकवाड सह अन्य इतर उपस्थित होते,सुत्रसंचलन सविता भालेराव यांनी केले तर मेट्रन पल्लवी चव्हाण यांनी प्रस्तावना केली,अनोखी परीने आभार मानले.