मजहर शेरीकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सोलापूर शहर जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती
मजहर शेरीकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सोलापूर शहर जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने श्री. मजहर शेरीकर यांची सोलापूर शहर जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया ताई सुळे विधानमंडळ पक्षनेते मा. आ. जयंतराव पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आ. शशिकांत शिंदे साहेब तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. महेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.
मजहर शेरीकर यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सोलापूर शहरातील युवकांना पक्षाशी जोडणे, युवक संघटना बळकट करणे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे सांगितले.
या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून मजहर शेरीकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
"पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन."