जिल्हा परिषद धाराशिव : लिफ्ट बंदीमुळे दिव्यांगांचे हाल; प्रहार संघटनेचा ठाम इशारा

जिल्हा परिषद धाराशिव : लिफ्ट बंदीमुळे दिव्यांगांचे हाल; प्रहार संघटनेचा ठाम इशारा
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव प्रतिनिधी:
धाराशिव जिल्हा परिषदेत लिफ्ट बंद असल्यामुळे विविध समस्यांवर निवेदन देण्यासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका सामान्य नागरिकांवर आणि विशेषत: दिव्यांग बांधवांवर बसत आहे.

दिव्यांगांची व्यथा कोण ऐकणार, असा प्रश्न उपस्थित झाला असून, प्रहार संघटनेने प्रशासनाच्या निष्काळजीपणाला ठाम इशारा दिला. संघटनेच्या वतीने प्रशासनाला तात्काळ लिफ्ट सुरू करण्याची मागणी केली गेली आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याची जबाबदारी घेण्याचे आव्हानही दिले गेले.

प्रहार संघटनेने स्पष्ट सांगितले की अधिकारी निवेदन खाली घेण्यासाठी येईपर्यंत कोणताही दिव्यांग बांधव इथून जाऊ शकणार नाही. या ठाम इशाऱ्यावर शासन खडबडून जागे झाले, उपस्थित अधिकारी निवेदन घेऊन त्वरित लिफ्ट बसवण्याचे व दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

संघटनेच्या ठाम पाठपुराव्यामुळे प्रशासनाला निष्काळजीपण दूर करावे लागले, ही घटना शहरातील दिव्यांग बांधवांसाठी मोठी विजयाची बाब ठरली आहे. तसेच, येत्या काळात लिफ्ट दुरुस्त न झाल्यास प्रहार संघटना आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देत आहे.

#DivyangRights #धाराशिव  #SocialJustice  #AccessibilityForAll  #आंदोलन #JusticeForDivyang
Bacchu Kadu Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Pratap Sarnaik Dnyanraj Chougule - ज्ञानराज चौगुले Tanaji Sawant - तानाजी सावंत

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक