"तेरणा फार्मसी च्या वतीने फार्माविक "उमंग २०२६" चे यशस्वी आयोजन व गुणवंतांचा सत्कार""उमंग २०२६": तेरणा फार्मसीचा गुणवंतांना सलामतेरणा फार्मसीचा "उमंग २०२६" सांस्कृतिक सोहळा :

"तेरणा फार्मसी च्या वतीने फार्माविक "उमंग २०२६" चे यशस्वी आयोजन व गुणवंतांचा सत्कार"

"उमंग २०२६": तेरणा फार्मसीचा गुणवंतांना सलाम

तेरणा फार्मसीचा   "उमंग २०२६"  सांस्कृतिक सोहळा :  जागतिक कंपन्यांमध्ये निवड झालेल्या व  जीपॅट परीक्षा उत्तीर्ण  गुणवंतांचा सन्मान, पालकांचा सहभाग

फार्मसी विभागात ‘फार्मावीक’चे उत्साही आयोजन; विद्यार्थी व पालकांचा सत्कार

तेरणा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या फार्मसी विभागात सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम

कला, कौशल्य आणि गुणवत्तेचा संगम – तेरणा फार्मसी विभागाचा सांस्कृतिक उत्सव
धाराशिव : 
श्री संजय राम गुरव सर (उपायुक्त, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन) यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गुरव सरांनी महाविद्यालयीन जीवनात आत्मसात केलेल्या तांत्रिक कौशल्यांचा व इंटर्नशिपचा करिअरवर होणारा सकारात्मक परिणाम विशद केला. प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी विद्यार्थ्यांना शिस्त व अभ्यासातील कटिबद्धतेचे महत्त्व सांगितले. तसेच, महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रम, प्लेसमेंट उपक्रम, प्रशिक्षण सत्रे व उच्च शिक्षण अभ्यासक्रम यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांसह उपस्थित असलेले गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक. जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार करण्यात आला. जीपॅट २०२६ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ओंकार गंजे व सुमित चोपडे यांचाही त्यांच्या पालकांसह सन्मान करण्यात आला. तसेच, विद्यापीठ परीक्षेतील चारही वर्षांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकांच्या उपस्थितीत करण्यात आला.

‘फार्मावीक २०२६’ अंतर्गत क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघासह रांगोळी, मेहंदी, बॉलिवूड डे व ट्रॅडिशनल डे स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 

या कार्यक्रमात श्री व सौ. सुभाष बाबुराव चोपडे, श्री व सौ. गणपत एकनाथ हंगे, सौ उर्मिला भारत साळुंखे, श्रीमती सरला बाळासाहेब पाटील, सौ अंकिता संजय गंजे, श्री व सौ जनक शामराव कुलकर्णी, श्री सुहास मल्लिकार्जुन शेरकर, श्री व सौ आप्पासाहेब हरिदास शिंदे, श्री व सौ बाबा मिर्झा बेग, श्री व सौ बाळासाहेब मच्छिंद्र हाके, श्री व सौ युवराज श्रीहरी क्षीरसागर, श्री व सौ गोरोबा बब्रुवान दंडनाईक, व श्री किरण लक्ष्मणराव डेंगळे, हे पालक आपल्या पाल्यांचे कौतुक करण्यासाठी या सत्कार समारंभात आत्मियतेने सहभागी झाले होते. 

फार्मसी विभागप्रमुख डॉ. प्रीती माने म्हणाल्या, "अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो." कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आर्षद शेख, प्रा. संदीप नलगे, प्रा. सायली पवार, डॉ. राजेश ननवरे, प्रा. अबुसुफियान काजी,  प्रा. अनुराधा भगत, प्रा. अल्मास शेख, श्री. आर. एल. मुंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

जागतिक कंपन्यांमध्ये निवड झालेल्या व  जीपॅट परीक्षा उत्तीर्ण  विद्यार्थ्यांचे   संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त श्री. मल्हार पाटील, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, फार्मसी विभागप्रमुख डॉ. प्रीती माने,  सर्व विभागप्रमुख व विभागातील सर्व प्राध्यापकवृंदानी व विद्यार्थ्यांनी मनापासून अभिनंदन केले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक