जिल्ह्यात ईद-उल-अजहा उत्साहात साजरीमशिदी व ईदगाहमध्ये विशेष नमाज; शहरात सलोखा आणि बंधुत्वाचे दर्शन

जिल्ह्यात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

मशिदी व ईदगाहमध्ये विशेष नमाज; शहरात सलोखा आणि बंधुत्वाचे दर्शन
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव, दि. २८ मे २०२६ : इस्लाम धर्मातील प्रमुख आणि पवित्र सण असलेली ईद-उल-अजहा अर्थात बकरीद ईद गुरुवारी जिल्ह्यासह शहरात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.

सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी विविध मशिदी आणि ईदगाहमध्ये एकत्र येऊन विशेष नमाज अदा केली. नमाजनंतर उपस्थितांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शहरातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील हिंदू तसेच इतर धर्मीय बांधवांनीही ईदगाह परिसरात भेट देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शहरात बंधुत्व, ऐक्य आणि सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले.

(छायाचित्र : जब्बार शेख)

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक