*धाराशिव-लातूर-बीड निवडणुकीत नवा ट्विस्ट, एकाच तालुक्यातील दोन मोठे नेते विधानपरिषदेच्या रिंगणात; कोण मारणार बाजी?* *भाजप मधल्या निष्ठावंताना डावल्यामुळे नाराजी तर काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण*धाराशिव

*धाराशिव-लातूर-बीड निवडणुकीत नवा ट्विस्ट, एकाच तालुक्यातील दोन मोठे नेते विधानपरिषदेच्या रिंगणात; कोण मारणार बाजी?*  
*भाजप मधल्या  निष्ठावंताना  डावल्यामुळे नाराजी तर काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण*
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत उमरग्याच्या दोन भूमिपुत्रांमध्ये थेट लढत होत आहे. महायुतीकडून माजी मंत्री बसवराज पाटील तर महाविकास आघाडीकडून महेश देशमुख रिंगणात उतरले आहेत.

निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यंदा धाराशिव-लातूर-बीड या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. तसेच हे दोन्ही उमेदवार उमरगा तालुक्याचेच भूमिपुत्र आहेत. त्यामुळे ही लढत संपूर्ण मराठवाड्यासाठी कमालीची चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. आज हे दोन्ही उमेदवार धाराशिवचे जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्याकडे आपले नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत. या निवडणुकीत “दीर्घ अनुभव विरुद्ध युवा निष्ठावंत” असा थेट सामना पाहायला मिळत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक