वकीलाला अपशब्द, अट्रॉसिटीची धमकी - महिला तक्रार निवारण केंद्रातील प्रकारसंघटना आक्रमक, निषेध - जिल्हाधिकाऱ्याकडे कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा

वकीलाला अपशब्द, अट्रॉसिटीची धमकी - महिला तक्रार निवारण केंद्रातील प्रकार

संघटना आक्रमक, निषेध - जिल्हाधिकाऱ्याकडे कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा 
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव - जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संचलित महिला तक्रार निवारण केंद्रातील महिला कर्मचारी यांच्याकडून वकिलाला अपमानजनक व मानहानीकारक वागणूक देऊन खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याची धमकी दिल्याची घटना घडली. यानंतर जिल्हा विधीज्ञ संघ आक्रमक झाला असुन कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना देण्यात आले. अध्यक्ष ऍड खंडेराव चौरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेत निषेध नोंदविला. 

धाराशिव जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य ऍड सुमित बाळासाहेब खोसे हे 18 मे रोजी महिला तक्रार निवारण केंद्र कार्यालयात कोर्ट प्रकरण दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नक्कल मागण्यासाठी गेले असता तिथे असलेल्या कर्मचारी संध्या तेरकर व शारदा गडले यांनी कोणत्याही प्रकरणात नकला मिळणार नाहीत. तू वकील असला तर काय झाले? तुम्हा वकिलांना किती अक्कल असते ते आम्हाला चांगल माहिती आहे. असे म्हणुन अपनामित केले.

ऍड खोसे यांनी आवश्यक महिती मागण्यासाठीचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज दिल्यानंतर तो ही स्विकारला नाही व उलट नक्कला मागणी केल्या तर शासकिय कामात अडथळा आणला म्हणून तसेच विनयभंगाची व अट्रॉसिटीची तक्रार आनंद नगर पोलीस स्टेशनला देवून तुझ्यावर गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली. याबाबत कारवाई करावी अशी मागणी वकिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक