शिवसेना धाराशिव जिल्हा लोकसभा सह-संपर्कप्रमुखपदी सूरज (महाराज) साळुंके यांची नियुक्तीपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; हिंदुत्वाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

शिवसेना धाराशिव जिल्हा लोकसभा सह-संपर्कप्रमुखपदी सूरज (महाराज) साळुंके यांची नियुक्ती

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; हिंदुत्वाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार 

राहुल कोरे आळणीकर 

धाराशिव -वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदिय गटनेते डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या धाराशिव जिल्हा लोकसभा सह-संपर्कप्रमुखपदी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सूरज (महाराज) साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते साळुंके यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या नियुक्तीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावेळी बोलताना सूरज (महाराज) साळुंके यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे काम करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही साळुंके यांनी स्पष्ट केले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक