देवळाली येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद९१४ अर्जांपैकी ८८४ अर्ज निकाली; ३१ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी स्वीकृतजिल्हाधिकारी कीर्तीकरण पुजार, उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख व तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आयोजन

देवळाली येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
९१४ अर्जांपैकी ८८४ अर्ज निकाली; ३१ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी स्वीकृत
जिल्हाधिकारी कीर्तीकरण पुजार, उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख व तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आयोजन
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव -धाराशिव ग्रामीण महसूल मंडळामार्फत देवळाली येथे आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” टप्पा क्र. १ ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “प्रशासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत महसूल विभागाने विविध शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून दिल्या.
या शिबिरामध्ये विविध योजनांअंतर्गत एकूण ९१४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ८८४ अर्जांचे तात्काळ निवारण करण्यात आले, तर ३१ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी स्वीकृत करण्यात आले. शिबिरात ७/१२ दुरुस्ती, फेरफार नोंदी, वारस नोंद, उत्पन्न, जातीचे व रहिवासी दाखले तसेच विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सामाजिक न्याय योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ज्योती शशिकांत इंगळे तसेच दिव्यांग लाभार्थी गुलचंद सपकाळ यांना लाभ प्रदान करण्यात आला. कृषी विभागामार्फत महाडीबीटी योजनेंतर्गत लाभार्थींना ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वितरणही करण्यात आले.
तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी प्राप्त अर्जांचे तात्काळ निवारण करत उर्वरित अर्जांचे नियमानुसार एक महिन्याच्या आत निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागासह विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांनी विशेष परिश्रम घेत नागरिकांना तत्पर सेवा उपलब्ध करून दिली.
या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक