श्री तुळजाभवानी देवींला अर्धा किलो वजनाचे चांदीचे वाहिक अर्पण
श्री तुळजाभवानी देवींला अर्धा किलो वजनाचे चांदीचे वाहिक
अर्पण
धाराशिव प्रतिनिधी
पुण्यातील पिंपळे गुरव येथील भाविक दिगंबर बसवंतराव बिरादार यांनी आज श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी अर्धा किलो वजनाचे चांदीचे वाहिक अर्पण केले. यामध्ये चांदीचा मुकुट तसेच देवीसाठी कानातील मासे यांचा समावेश आहे.
दिगंबर बिरादार हे आज श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापूरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी देवीला अर्धा किलो वजनाचे चांदीचे कानातील मासे आणि चांदीचा मुकुट अर्पण केला.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दिगंबर बिरादार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विकास वाणी, महेश गंजे, सूरज घुले तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.