महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘RuPay On-The-Go’, NCMC सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मा. ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब, मा. श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.

एसटी प्रवासात डिजिटल क्रांती ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्ड योजनेने प्रवाशांना मोठा दिलासा
राहुल कोरे आळणीकर 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘RuPay On-The-Go’, NCMC सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मा. ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब, मा. श्रीमती सुनेत्रा पवार धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.

यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक श्री. रमेश ढावरे, तसेच सवलतधारक महिला संगिता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते NCMC स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. 

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न NCMC स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून, प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे.

या उपक्रमामुळे राज्यातील लाखो सवलतधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, एसटीच्या सेवांचा वापर अधिक सोयीस्कर व आधुनिक पद्धतीने करता येईल, याचे समाधान आहे. 

सदर योजनेची अंमलबजावणी M/s. E-Infochips Technologies Ltd. आणि NSDL Payments Bank यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असून, राज्यातील सर्व आगार व बसस्थानकांवर नोंदणी व वितरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय, सुमारे ३ हजार अधिकृत केंद्रांवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

#Devendrafadanvis #eknathshinde 
#Pratapsarnaik #NCMCCARD

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक