*किणी येथे पोलीस दलात निवडीबद्दल शेतकरी पुत्रांचा लोमटे यांच्या वतीने सत्कार*

*किणी येथे पोलीस दलात निवडीबद्दल शेतकरी पुत्रांचा लोमटे यांच्या वतीने सत्कार*
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील मौजे किणी येथील शेतकरी पुत्र कु. रितेश राजेंद्र दंडनाईक कु. विनय विजयकुमार पवार यांची पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तुगाव येथील भाजपा तालुका चिटणीस सचिन लोमटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 याप्रसंगी रितेश विनय यांचे आई वडील व नेताजी मोरे, विनोद शिंदे, सुजाता मोरे, सुषमा लोमटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

परिश्रमाला जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड दिल्यास निश्चितच अपेक्षित फळ मिळते. परिस्थितीचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीशी दोन हात करून यश कसे पदरात पाडता येईल, हा विचार करणारेही बरेच जण आहेत. आपण ठरविलेले ध्येय गाठायचेच हीच खूणगाठ बांधून परिश्रम घेणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांना अखेर यश मिळाले.

विशेष म्हणजे, रितेश चा भाऊ रोहित दंडनाईक याची एक वर्षापूर्वीच पोलीस दलात भरती झाली होती. भावाने खाकी वर्दी परिधान करून जो आदर्श निर्माण केला, तोच डोळ्यासमोर ठेवून रितेशनेही “आपला भाऊ पोलीस झाला, तर आपणही पोलीस होणारच” असा निर्धार केला आणि अवघ्या एका वर्षात त्यानेही खाकी वर्दी परिधान करून दाखवलीच..!

भावाच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कठोर परिश्रमामुळे रितेशने हे यश संपादन केले.
आपला रितेश पोलीस झाल्याची बातमी कळताच आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.

 या यशाबद्दल एकाच गावातील रितेश व विनय यांचे पोलीस दलातील निवडीबद्दल अभिनंदन व कौतुक होत असून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणा मिळेल.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक