संभाजी ब्रिगेडची धाराशिवमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; निलेश साळुंके यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती
संभाजी ब्रिगेडची धाराशिवमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; निलेश साळुंके यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती
धाराशिव – संभाजी ब्रिगेड (पक्ष) ची महत्त्वपूर्ण बैठक 13 एप्रिल 2026 रोजी धाराशिव येथे जिल्हाध्यक्ष आकाश मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीत संघटन बळकटीसाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी निलेश पार्वती राम साळुंके यांची संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा संघटकपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
निलेश साळुंके यांच्या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. बैठकीत संघटन विस्तार, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, जिल्हा सचिव आदित्य देशमुख, जिल्हा संघटक शाहनवाज सय्यद व गणेश साळुंखे, शहराध्यक्ष शिवश्री शुभम चव्हाण, शहर कार्याध्यक्ष पवन आवटे, शहर संघटक अमर घोडके, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, तालुका कार्याध्यक्ष संतोष लाकाळ यांच्यासह प्रजय पवार, नितीन मुंडे, गोविंद पाटील, आकाश सहाणे, रवी चव्हाण, अमोल पाटील, खंडू कसबे, श्रावण धावारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विजय बाप्पा पवार आणि शहराध्यक्ष महेश इंगळे यांनीही बैठकीस उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
संघटन मजबूत करून आगामी काळात सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.