धाराशिव प्रहारचे मशाल आंदोलन: शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग मानधनासाठी जोरदार आंदोलन

धाराशिव प्रहारचे मशाल आंदोलन: शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग मानधनासाठी जोरदार आंदोलन
राहुल कोरे आळणीकर 

धाराशिव -राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शेतकरी व दिव्यांगांच्या न्याय मागण्यासाठी 'मशाल आंदोलन' पुकारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात प्रहार दिव्यांग क्रांती व जनशक्ती पक्षाच्यावतीने आमदार कैलास पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या निमित्ताने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची ११ एप्रिल रोजी होणारी जयंती विशेष साजरी करत, कार्यकर्त्यांनी गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन सरकारविरोधात संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने कर्जमाफी देण्यात यावी, तसेच दिव्यांगांना दरमहा ६००० रुपये मानधन देण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली.
या आंदोलनाच्य प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत
1. सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ करावी.
2. पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्च MREGS अंतर्गत द्यावा.
3. दिव्यांग बांधवांना ६००० रुपये मासिक मानधन मंजूर करावे.
या आंदोलनात धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी निवेदन देत या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. "ही मशाल विधानसभेपर्यंत न्याय मिळवण्यासाठी उजेड घेऊन जाईल," असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनाला प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह बाळासाहेब कसबे,बाळासाहेब पाटील ,महादेव चोपदार, महादेव खंडाळकर ,महेश माळी जमीर शेख ,दिनेश पोतदार, संजय नाईकवाडी, नवनाथ कचार,गौतम दुबे,विकास शिरसागर ,शिवाजी नेपते, दगडू चौरे , भूजंग चौरे ,सहदेव कांबळे, बबलू शेख ,राहुल कांबळे ,अर्जुन वाघमारे ,पैगंबर कादरसे, प्रवीण कांबळे, रंगनाथ बर्वे, तानाजी मगर, पिंटू मगर, दत्ता राऊत ,शिवाजी खडके, हरी कुंभार, साहेब पठाण ,रोहित क्षीरसागर, नागनाथ कोरे, हरिदास कुंभार, अंकुश महाजन ,सोमनाथ कोरे ,महेश जाधव, सोमनाथ मिलाके ,बाबासाहेब साळुंखे, बाबा गायकवाड, सुधीर साळुंखे ,वैजनाथ कोरे ,बालाजी तांबे ,संजय शिंदे, प्रवीण इंगळे ,सचिन जाधवz चांगदेव चौधरी, दत्ता सारंग, दिनेश पोतदार ,सबदार सय्यद, जीवन बोडके, इंद्रजीत मिसाळ ,चांगदेव चौधरी, दत्ता सारंग, प्रकाश खडके, धनंजय खांडेकर, संजय पडुळकर ,शिवाजी कांबळे, सतीश मदने ,ताजुद्दीन तांबोळी, गौतम माने, आदींसह प्रहार सैनिक व शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक