बासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सलग तीन तास वाचन करून उत्साहात साजरी

**जि. प. प्राथमिक शाळा आळणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  १३५ वी जयंती विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सलग तीन तास वाचन करून उत्साहात साजरीकेली* 
राहुल कोरे आळणीकर 
आळणी (ता. धाराशिव) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी शाळेतील वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी झाले होते.
जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी तीन तास वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत झाली.
कार्यक्रमात 150  विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यशश्री कदम,शरयू वीर, श्रेया पौळ,कार्तिकी भोसले  या विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. आरोही निंबाळकर व अंजली माळी या विद्यार्थिनींनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.त्यांच्या विचारांचा समाजावर झालेला परिणाम आणि शिक्षणाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे भाष्य केले.
इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कु. यशश्री सुरज कदम हिने बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीतावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
तसेच, शाळेतील शिक्षिका श्रीमती इंगळे सुमन,श्रीमती सावळकर महादेवी,श्रीमती नवले जनाबाई,श्रीमती वीर राधाबाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर सविस्तर प्रकाश टाकत त्यांच्या संघर्षमय जीवनाची आणि समाज सुधारण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग सांगितले. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे आयोजन पद्धतीने करण्यात आले असून, सर्वांच्या सहभागामुळे जयंती उत्सव अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश पेठे यांनी केले तर आभार श्री हनुमंत माने यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजेंद्र दीक्षित, श्रीमती मुपडे, अश्विनी भांगे, नेहा भंडारे  यांनी परिश्रम घेतले

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक