.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज भव्य मिरवणूक डी. एस. ग्रुपच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज भव्य मिरवणूक 

डी. एस. ग्रुपच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव -महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात मध्यवर्ती जयंती समारोह समिती व डी. एस. ग्रुपच्यावतीने बुधवारी सायंकाळी 4 वाजता मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भीम अनुयायी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी  केले आहे. 
बुधवारी सायंकाळी 4 वाजता शहरातील भीमनगर येथील क्रांती चौकातून मिरवणूक सेाहळ्यास प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून सौंदाळाचे सरपंच शरदराव आरगडे पाटील, विशाल शिंगाडे (कोषाध्यक्ष), आणि प्रविण सूर्यवंशी (अध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 
ही मिरवणूक रथयात्रा भीम नगर, क्रांती चौक, भीम जयंतीनिमित्त होणार्‍या या भव्य आयोजनामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरवणूक व सामाजिक उपक्रमांत सर्व भीमप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, विशाल शिंगाडे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक