धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ

धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव-धाराशिव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्ष सौ. नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांच्या नेतृत्वाला चालना देत प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी दीर्घकालीन व तातडीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. पाणीपुरवठा यंत्रणेत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश आमदार पाटील यांनी दिले.
नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांनीही शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पुढाकाराला आमदार पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
यावेळी नगर परिषद धाराशिवचे मुख्याधिकारी नीता अंधारे, उपाध्यक्ष अक्षय ढोबळे, भाजपा गटनेते अमित शिंदे, नगरसेवक राहुल काकडे, उजनी धरणाशी संबंधित वीजपुरवठा विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीमुळे धाराशिव शहरातील पाणीपुरवठा प्रश्नांवर ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्यास गती मिळणार असून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक