मंगळूर येथील हत्येचा छढा लागला! धाराशिव पोलिसांनी आरोपीला २४ तासात पकडले

मंगळूर येथील हत्येचा छढा लागला!
 धाराशिव पोलिसांनी आरोपीला २४ तासात पकडले
 राहुल कोरे आळणीकर 
तुळजापूर -मंगरूळ येथील ३६ वर्षीय कृष्णाथ
आनंद साठे यांच्या खून प्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात मयताची पत्नी प्रतिभा साठे (वय २८) व तिचा प्रियकर शुभम घाटूळे (वय २०) यांना ताब्यात घेण्यात आले असून, आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.
बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील नटकल पुलाजवळ साठे यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीपासूनच हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.
तपासादरम्यान आरोपींनी डोक्यात दगडाने वार करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुलाजवळ आणून टाकण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. तसेच मृतदेह काही अंतर फरपटत नेल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत वेगाने कारवाई केली.पत्नीच या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आल्याने प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक