*तुगाव येथे पंचायत राज योजनेअंतर्गत महिलांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

*तुगाव येथे पंचायत राज योजनेअंतर्गत महिलांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव: धाराशिव तालुक्यातील तुगांव येथे पंचायत राज योजनेअंतर्गत मारुती मंदिर परिसरात महिलांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन आणि गाव हरित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात गावातील महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारची रोपे लावली. तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी महिलांनी समाजकार्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

या उपक्रमामुळे तुगाव गावाच्या सौंदर्यात भर पडणार असून महिलांच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

आपली जबाबदारी केवळ झाड लावणे म्हणजे वृक्षारोपण नव्हे, तर लावलेले झाड जगवणे आणि त्याचे संवर्धन करणे ही खरी जबाबदारी आहे. "प्रत्येकाने एक झाड लावावे आणि ते जगवावे" हा मंत्र आपण अंमलात आणला पाहिजे.

 याप्रसंगी मनीषा केंद्रे, अक्षता हाजगुडे,पोलीस पाटील श्रुतिका हाजगुडे, उमेद प्रभागसंघ व्यवस्थापक रूपाली शेंडगे, उमेद सीआरपी सुजाता मोरे, ग्रामसंघ सचिव स्वप्नाली हाजगुडे, उमेद पशु सखी रेणुका भुतेकर, मीना हाजगुडे, राजकन्या गोरे, लक्ष्मी थोरात, पूजा चौधरी, सुदामती शेंडगे व इतर महिला उपस्थित होत्या.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक