पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सरकार कटिबद्ध; उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सरकार कटिबद्ध; उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही
धाराशिव -“पत्रकारांचे कार्य अत्यंत आव्हानात्मक असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. धाराशिव येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात ते बोलत होते.ते पुण्य नगरी’' व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बक्षीस व पुरस्कार सोहळ्यात बोलत होते 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री  प्रताप सरनाईक होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात घेतलेले ५६७ निर्णय सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आहेत.
‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार
शेतकरी सन्मान योजनेत राज्याकडून अतिरिक्त मदत
आपत्तीग्रस्तांना ३२ हजार कोटींची मदत
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून थेट सेवा
तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाद्वारे दुष्काळमुक्तीचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तुळजाभवानी मंदिरासाठी 1868 कोटींचा आराखडा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी  मातेच्या  तुळजापूर  T विकासासाठी १८६८ कोटी रुपयांचा भव्य आराखडा मंजूर असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमात सहकार, उद्योग, वैद्यकीय, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘पुण्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कारही विविध गटांतील विजेत्यांना प्रदान करण्यात आले.

या सोहळ्यास माजी खासदार रवींद्र माजी आमदार ज्ञानराज चौगुले  , जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी   , सीईओ प्रिय वंदा महा डदाळकर  नगराध्यक्ष नेहा काकडे  जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे सचिव संतोष जाधव संतोष आंबेरे राजाभाऊ वैद्य श्रीकांत कदम  अबास शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारिता, समाजकार्य आणि विविध क्षेत्रातील योगदानाचा गौरव करताना उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी पत्रकारांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमामुळे धाराशिवमध्ये सामाजिक व बौद्धिक वातावरणाला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक