*जि.प. शाळा आळणीच्या गुणवत्तेचे सीईओ प्रियंवदा महाडदळकर यांच्याकडून कौतुक*

*जि.प. शाळा आळणीच्या गुणवत्तेचे सीईओ प्रियंवदा महाडदळकर यांच्याकडून कौतुक*
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव, प्रतिनिधी :
PAT (Periodic Assessment Test) परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद धाराशिवच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. प्रियंवदा महाडदळकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांची सविस्तर पाहणी केली.
यावेळी त्यांनी शाळेतील स्वच्छतागृहाची पाहणी केली. तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इनोव्हेटिव्ह अँड सायन्स सेंटर, अ‍ॅस्ट्रॉनॉमी लॅब व आयडियल कॉम्प्युटर सेंटर यांना भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली. शाळेत उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून मॅडमशी आत्मविश्वासाने संवाद साधत आपली बौद्धिक क्षमता दर्शविली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी तत्परतेने व प्रभावीपणे दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व वर्गांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी केली. तसेच PAT परीक्षेबाबत येणाऱ्या अडचणींबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.
शाळेच्या भौतिक सुविधांची पाहणी करून त्यांनी शाळेच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. “शाळेची गुणवत्ता अत्यंत उत्कृष्ट असून येथील सर्व विद्यार्थी हुशार आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले व शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शाळेस पहिल्यांदा भेट दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी व सरपंच प्रमोद काका वीर यांनी त्यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार केला शाळेची गुणवत्ता पाहून मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे खूप खूप कौतुक करून शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी  व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी वयक्तिक लक्ष देईन असे अभिवचन दिले 
यावेळी त्यांच्या समवेत शिक्षण विस्तार अधिकारी सौ. रंजना मैंदर्गी यांनीही प्रत्यक्ष वर्गात जाऊन पट पडताळणी केली व शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक