भीम जयंती महोत्सव 2026 : धाराशिव जिल्ह्यात भीम गीतांचा भव्य महासंगीत सोहळा रंगणार
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त धाराशिव जिल्ह्यात यंदा भव्य भीम जयंती महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला असून, जिल्हाभर भीम गीतांचा जल्लोष घुमणार आहे. या निमित्ताने विविध ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित गायकांच्या उपस्थितीत महासंगीत सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या प्रेरणेतून हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यात महाराष्ट्राचा सुपरस्टार आदर्श शिंदे, लोकगीतांचा बादशाह आनंद शिंदे, शिंदेशाहीचा बुलंद आवाज चंद्रकांत शिंदे तसेच इंडियन आयडॉलमधून प्रसिद्ध झालेली गायिका श्वेता दांडेकर हे कलाकार आपल्या सादरीकरणाने वातावरण भारावून टाकणार आहेत.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सायंकाळी ५ वाजता हे कार्यक्रम पार पडणार असून, हजारोंच्या उपस्थितीत भीममय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक:
कळंब – दि. ११ एप्रिल २०२६ | स्थळ: नगर परिषद मैदान
धाराशिव – दि. १६ एप्रिल २०२६ | स्थळ: लेडीज क्लब मैदान
तुळजापूर – दि. २२ एप्रिल २०२६ | स्थळ: हुडको मैदान
उमरगा – दि. २३ एप्रिल २०२६ | स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मैदान
परंडा – दि. २४ एप्रिल २०२६ | स्थळ: कोटला मैदान
या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले असून, सौ. साक्षी पाटील व मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.