येडेश्वरी यात्रा महोत्सव 2026 : पालखी मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - आमदार राणाजगजितसिंह पाटील

येडेश्वरी यात्रा महोत्सव 2026 : पालखी मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - आमदार राणाजगजितसिंह पाटील

राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव : जिल्ह्यातील प्रसिद्ध येडेश्वरी देवी यात्रा महोत्सव 2026 निमित्त भाविकांसाठी यंदाही भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येडेश्वरी देवीच्या पालखी मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, या उपक्रमामुळे यात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे.

ही पालखी मिरवणूक शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होण्याची अपेक्षा असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी चे आयोजन आमदार राणाजगजितसिंह पाटील (उपाध्यक्ष, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन – मित्र, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन तथा विधानसभा सदस्य, तुळजापूर-धाराशिव) यांच्या पुढाकारातून करण्यात येत आहे.

यात्रेदरम्यान हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी हा सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक