आळणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जल्लोषात साजरी! भीमसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग
आळणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जल्लोषात साजरी! भीमसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग
आळणी (ता. धाराशिव) — भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आळणी गावात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गावातील सर्व स्तरातील नागरिक, युवक, भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे सरपंच प्रमोद काका वीर, धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बनसोडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य अक्षय कदम यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला.
तसेच तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर लावंड, श्रीपाल भैया वीर, विनोद मामा लावंड, विकास पाटील, रामराजे वीर, विजय नांदे, तानाजी वीर, आबासाहेब साळुंखे, आनंद खोबरे, दादासाहेब गायकवाड, दत्तात्रय किरदत्त, समीर कदम, दिपराज कदम, तुषार कदम, अध्यक्ष अतिश कदम, कोषाध्यक्ष धनंजय कदम, उपाध्यक्ष नितीन कदम, तसेच मनोज कदम, सुरेश कदम, सुधीर कदम, किसन कदम, निलेश कांबळे, आकाश कदम, दीपक कदम, शरद कदम, युवराज आप्पा कदम, पद्माकर कदम, बाबासाहेब कदम, बाळासाहेब कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भीमसैनिक ऋतुराज कदम, अनिल कदम, जयराज कदम, नागेश पौळ, बाबासाहेब पौळ, युवराज नाना पौळ, विजय पौळ, संदेश पौळ यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन शिवछत्रपती मित्र मंडळ आळणी, छावा प्रतिष्ठान आळणी यांच्या सहकार्याने संघर्ष युवा प्रतिष्ठान आळणी यांनी केले होते. संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण असून, ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन, पुष्पहार अर्पण व विचार जागृती कार्यक्रम घेण्यात आले.
👉 या जयंती निमित्ताने सामाजिक एकोपा, समानता व न्याय यांचे विचार रुजवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.