छावा प्रतिष्ठान, आळणी वर्ष स्फूर्ती 1 वर्धापन दिन

छावा प्रतिष्ठान, आळणी 
वर्ष स्फूर्ती 1 वर्धापन दिन
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव -छावा प्रतिष्ठान, आळणी  स्थापना दिनांक 12 एप्रिल 2025 वार शनिवार (हनुमान जयंती)
प्रस्तावना :- छावा प्रतिष्ठान ही एक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वाभिमान,शौर्य,पराक्रम, झुंजार संघर्ष, युद्ध नीती, न्यायनीती, निर्भयता, निडर,धर्म निष्ठा,बलिदंन त्याग ,शिक्षण,निस्वार्थी भावना, निर्व्यसनी , अष्टपैलू, नम्रता, दूरदृष्टी, असलेल्या राजा विचारा प्रति ही संघटना
अराजकीय, अधर्मय, सामाजिक हित जोपासून, समाजातील प्रतेक घटकासाठी काम करणारी संस्था आहे
सदरील ग्रप मध्ये 50 सदस्य आहेत आणि त्या प्रतेक सदस्य हा महिन्याला 100 रुपये प्रमाणे बचत जमा करतात आणि तीच रक्कम समाज हिता काम साठी वापर केली जाते.
छावा प्रतिष्ठान, आळणी तर्फे आज पर्यंत केलेली कामे
छावा प्रतिष्ठान ही संस्था आळणी गावातील मध्यवर्ती ठिकाणी जुनी ग्रामपंचायत या ठिकाणी असून या ठिकाणावरून  पवित्र कामाची सुरुवात करण्यात आली 

1) आळणी गावातील दहावी उत्तीर्ण वर्गातील प्रथम विद्यार्थ्यांचा सत्कार 

2) आळणी गावातील गुणवंत नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर होण्यासाठी पात्र झालेल्या सर्व 10 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 

3) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त, संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा,
श्री जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय
105 डझन शालेय वही,पेन, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले

4) श्री जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय 
छावा प्रतिष्ठान, आळणी ग्रुप संकल्पना मधून शाळेच्या 2004-2005 बॅच तर्फे एक्वा पाणी फिल्टर प्रत्येक ताशी  50 लिटर फिल्टर पाणी अशी क्षमतेचे 20000 किमतीचे फिल्टर देण्यात आले

5) श्री जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय हॉलीबॉल खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले 

6) जुने ग्रामपंचायत आळणी समोर दूतर्फे वृक्ष लागवड झाडे लावण्यात आली व त्याला स्टी गार्ड लावण्यात आले 

7) तरुणांसाठी व्यायामशाळा दुरुस्ती करून सुरू करण्यात आली (होळी)  चौक आळणी या ठिकाणी 

8) स्व आधार मतिमंद मुलीचे बालगृह आळणी या ठिकाणी 
दिवाळी भाऊबीज निमित्त 125 फराळ किट वाटप करण्यात आले 

9) मॉ. साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 150 डझन केळी वाटप करण्यात आली 
जिल्हा परिषद शाळा आळणी
श्री जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय 
स्व:आधार मतिमंद मुलीचे बालग्रह या ठिकाणी 

10) आषाढी एकादशीनिमित्त आळणी गावातील ग्रामदैवत श्री विठ्ठल दिंडी आषाढी एकादशीच्या निमित्ताने छावा प्रतिष्ठान तर्फे भावी भक्तांना 110 डझन केळी वाटप करण्यात आले 

11) जिल्हा परिषद शाळा आळणी 
रुपये 13900 किमतीची साउंड सिस्टीम देण्यात आली 

12) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास 2026 मध्ये नरसोबा मंदिर आळणी या ठिकाणी पूजा मांडून पाळण्यात आला 

13) शिवजन्म महोत्सव 2026 मध्ये छावा प्रतिष्ठान, आळणी व सद भावना परिवार यांच्या संयुक्त विद्यामाने आळणी गावातील 50 गुणवंत, नवनीत शासकीय कर्मचारी, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, व शिक्षक यांच्या गुणगौरव सोहळ्याचे मध्ये उल्लेखनीय काम करण्यात आले 

14) नवीन ग्रामपंचायत या ठिकाणी होर्डिंग बोर्ड उभा करण्यात आला 10×15

15) तरुणांसाठी हॉलीबॉल ग्राऊंड खंडोबाचा माळ या ठिकाणी सुरू करण्यात आले 

16) जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकाळात छावा प्रतिष्ठान, आळणी तर्फे संपूर्ण मतदारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचे आव्हान सोशल मीडिया द्वारे करण्यात आले 
व मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली

आज पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला वर्धापन दिन साजरा करत असताना आपल्या गावातील ह ,भ ,प महादेव महाराज तांबे यांच्या हस्ते व
गावातील वारकरी संप्रदायाची दिंडी समवेत तेर संत गोरोबा काका यात्रेनिमित्त मार्गस्थ होत असताना सर्व गावकरी, वारकरी, माळकरी, टाळकरी तसेच प्रतिष्ठान मधील सर्व सदस्य उपस्थित होते व या ठिकाणी वर्धापन दिन हरिनामाच्या व शिवरायांच्या, शंभू महाराजांच्य जयघोष मध्ये साजरा करण्यात आला 🙏🏻💐🚩

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक