*घाम, जिद्द आणि निस्वार्थ भावनेतून उभं राहिलेलं हरित लातूर* आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचा प्रवास २५०० दिवसांचा.
४ एप्रिल २०२६ रोजी आमच्या कार्याला अखंड २५०९ दिवस पूर्ण होत आहेत.
दररोज चार तास श्रमदान
*दुष्काळी रेल्वेने पाणी आलेलं लातूर ते हरित लातूर प्रवास.....*
*घाम, जिद्द आणि निस्वार्थ भावनेतून उभं राहिलेलं हरित लातूर* आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचा प्रवास २५०० दिवसांचा.
राहुल कोरे धाराशिव
लातूर दुष्काळाने जखम झालेलं शहर. पाण्यासाठी रेल्वे धावली, आणि त्या घटनेने लातूरच्या नावावर एक वेदनादायक कलंक उमटला. कोरडं आभाळ, पाण्याची टंचाई, शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती हळूहळू हे शहर “मागास” म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
पण या सगळ्या अंधारात काही तरुणांच्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न होतं *लातूरला पुन्हा जिवंत करण्याचं, हरित, स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं.*
आणि इथूनच जन्म झाला आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचा.
👉 *आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन ही फक्त चळवळ नाही… ही वेडाची परिसीमा आहे*
ही संस्था म्हणजे काही सामान्य काम नाही. हे आहे वेड निसर्गासाठी, मातीसाठी, आपल्या शहरासाठी!
या तरुणांनी ओळखलं की दुष्काळाचं मूळ कारण म्हणजे *कमी वृक्षसंख्या*.आणि मग त्यांनी ठरवलं
👉 *झाडे लावायची… आणि ती जगवायची!* या ध्येय्याने प्रेरित होत *२५०० दिवस… एकही दिवस थांबले नाहीत*
मागील *२५०० दिवसांत*,
या आमचं ग्रीन लातूर फाउंडेशनच्या सदस्यांनी उन्हातान्हात, पावसात, वाऱ्यात स्वतःचा वेळ, श्रम आणि आयुष्य या कामासाठी दिलं.
* रस्त्यांच्या दुतर्फा , ग्रीन बेल्ट, दुभाजकांमध्ये खड्डे खणले
* कोरड्या जमिनीत रोपे लावली
* पाण्याची सोय केली
* प्रत्येक झाडाची मुलासारखी काळजी घेतली
👉 झाड लावणं सोपं असतं…
👉 पण ते *जगवणं* हाच खरा संघर्ष.
आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी हा संघर्ष जिंकला, आज लातूरच्या रस्त्यांवर हिरवाई दिसते, ती या तरुणांच्या घामाची साक्ष आहे.
*रुक्षतेतून हरिततेकडे एक जिवंत परिवर्तन*
लातूर शहरातील
* मुख्य रस्ते
* दुभाजक, बाह्य वळण रस्ते
* शासकीय कार्यालये
* शाळा, महाविद्यालये
* कोर्ट, पोलीस स्टेशन, कारागृह
* धार्मिक स्थळे, स्मशानभूमी, कब्रस्तान, इत्यादी
या सगळ्या ठिकाणी *झाडे उभी आहेत आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सदस्यांच्या मेहनतीची जिवंत स्मारके म्हणून !*
*स्वच्छतेसाठीही तेवढीच झुंज* हरित लातूरसोबतच *स्वच्छ लातूर* हेही त्यांचं स्वप्न होतं. कचऱ्याने भरलेले रस्ते
रिकाम्या प्लॉटमध्ये साचलेली घाण हे पाहून ते फक्त बोलले नाहीत आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी स्वतः हातात झाडू घेतला! वेळोवेळी साफसफाई करत, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत लातूरला स्वच्छतेची सवय लावण्याचा प्रयत्न सुरू झाला.
*कचऱ्याची समस्या ओळखली आणि उपायही शोधला*
कचरा का साचतोय?
कारण छोटे व्यवसायिक दुकानदार, फेरीवाले यांच्याकडे *कचरा टाकायला कुंडी नाही!* मग त्यांनी काय केलं? रिकामे ड्रम विकत घेतले त्यापासून कचरा कुंड्या तयार केल्या आणि त्या *मोफत वाटल्या* आज अनेक ठिकाणी कचरा नीट साठवला जातो, हा बदल छोटा नाही, ही मानसिकतेतील क्रांती आहे!
*सुंदर लातूर अभिमानाची ओळख*
भिंतींवरचे पोस्टर्स, जाहिराती
शहराचं सौंदर्य बिघडवत होत्या.
आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सदस्यांनी पुन्हा पुढाकार घेतला
👉 *पोस्टर फ्री लातूर*
भिंती स्वच्छ केल्याआणि त्यावर रंगवलं *संदेश, संस्कार आणि सौंदर्य!* आज त्या भिंती फक्त भिंती नाहीत, त्या बोलतात, शिकवतात आणि प्रेरणा देतात.
*प्लास्टिकविरुद्धची लढाई*
प्लास्टिकमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी
* कापडी पिशव्यांचे वाटप
* प्लास्टिक बाटल्यांमध्ये साठवण्याची सवय
* त्या बाटल्यांपासून *इको-ब्रिक्स*
👉 आणि त्या इको-ब्रिक्सपासून तयार झाले *बेंच*.
कचऱ्याचं संसाधनात रूपांतर
हा खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक विचार आहे.
👧👦 *पुढच्या पिढीत निसर्गाची बीजं*
या चळवळीचं खरं यश म्हणजे
*लहान मुलांच्या मनात रुजलेलं निसर्गप्रेम!*
* शाळांमध्ये जाऊन पर्यावरण शिक्षण
* प्रदूषणाविषयी माहिती
* बिजगोळे तयार करणे
* मुलांच्या हातात रोप दिलं.
आणि त्यांच्या मनात
भविष्याची आशा पेरली
*जीवनातील प्रत्येक क्षण आणि सण सुद्धा एका झाडासोबत*
या आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन संस्थेने सण-वार आणि परंपरांना एक सुंदर वळण दिलं.
* सण = वृक्ष लागवड
* बाळाचा जन्म = एक झाड
* मृत्यू = एक स्मृती वृक्ष
* प्रत्येक सणाला वृक्ष लागवड आणि मोफत रोपांचे वाटप सुद्धा उद्देश आपलं घर, गल्ली पर्यायाने शहर हरित झालं पाहिजे.
👉 आनंद असो वा दुःख
प्रत्येक क्षण निसर्गाशी जोडला गेला
*२५०० दिवसांची अविरत सेवा भावना शब्दांत मावत नाहीत*
आज ही संस्था *२५०० दिवसांच्या उंबरठ्यावर* उभी आहे, एकही दिवस थांबले नाहीत, एकही दिवस हार मानली नाही.
लातूरकर जेव्हा म्हणतात *“आज लातूर खरोखर बदललंय”*
तेव्हा प्रत्येक सदस्याचा उर भरून येतो, डोळ्यात अश्रू येतात, कारण त्या प्रत्येक झाडामागे आहे.
👉 त्यांचा घाम
👉 त्यांची मेहनत
👉 आणि त्यांचं निस्वार्थ असलेलं प्रेम आणि केलेला त्याग
*आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनची ही कथा आहे जिद्दीची, समर्पणाची आणि प्रेमाची*
*आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन* ही संस्था नाही, ती एक भावना आहे
👉 जिद्दीची
👉 कष्टाची
👉 आणि आपल्या मातीतल्या निःस्वार्थ प्रेमाची
हा प्रवास सांगतो *जर काही वेडे लोक ठरवतात…तर एक शहरही बदलू शकतं!*
आम्ही झाडें लावतो, जगवतो सुद्धा फक्त आपण लातूरकर म्हणून झाडें तोडू देऊ नका.
🙏🌳🤝🌳🙏
*आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन*
Mo 9326511681