धाराशिवसाठी अभिमानास्पद क्षण! ​धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!

धाराशिवसाठी अभिमानास्पद क्षण! 

​धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 
राहुल कोरे आळणीकर 
​मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि 'सेवाकर्मी' कार्यक्रमांतर्गत 'सर्वोत्तम जिल्हाधिकारी' म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. किर्ती किरण पुजार यांना सन्मानित करण्यात आले.

​प्रशासकीय कामात गतीमानता, पारदर्शकता आणि ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे सुलभ करण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही मोठी पावती आहे.

​जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय पातळीवर होत असलेले हे उत्कृष्ट कार्य आपल्या सर्वांसाठी भूषणावह आहे. मा. जिल्हाधिकारी महोदयांचे आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन!

​असाच विकासकामांचा रथ आपण सर्वांच्या सोबतीने पुढे नेऊया. 

#Dharashiv #Maharashtra #GoodGovernance #KirtiPujar #DevendraFadnavis #Development #DigitalIndia

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक