शिवसेना (उबाठा) चे माजी युवा सेना धाराशिव तालुकाप्रमुख व तडवळा गावचे युवा नेते गणेश भैय्या जमाले यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश माजी मंत्री तथा प्रा. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते पार पडला.



शिवसेना (उबाठा) चे माजी युवा सेना धाराशिव तालुकाप्रमुख व तडवळा गावचे युवा नेते गणेश भैय्या जमाले यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश माजी मंत्री तथा प्रा. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते पार पडला.
राहुल कोरे आळणीकर.                                         पुणे येथे आयोजित कार्यक्रमात गणेश भैय्या जमाले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन तालुक्यातील युवकांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा माझा संकल्प आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमात बोलताना प्रा. तानाजीराव सावंत यांनी गणेश भैय्या जमाले यांचे स्वागत करत, त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद धाराशिव तालुक्यात अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. युवकांमध्ये जमाले यांचे असलेले मजबूत नेटवर्क आणि संघटन कौशल्य पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रवेश सोहळ्यास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश भैय्या जमाले यांच्या या निर्णयामुळे धाराशिव तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक