*अर्चना ताई पाटील यांना आदर्श लोमटे कडून पेन्सिल स्केच चित्र भेट*
*अर्चना ताई पाटील यांना आदर्श लोमटे कडून पेन्सिल स्केच चित्र भेट*
धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद धाराशिव येथे त्यांचा सन्मान करण्यात आला.
तुगांव येथील लालबहादूर शास्त्री विद्यानिकेतन खेड येथे शिक्षण घेत असलेला इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी कु. आदर्श सचिन लोमटे याने अर्चनाताई यांचे हुबेहूब रेखाटन केलेले सुंदर पेन्सिल स्केच चित्र भेट देऊन त्यांचा गौरव केला.
अर्चनाताई पाटील यांनीही कलात्मक भेट स्वीकारत आदर्श याचे आभार मानले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रिती कदम, मा. जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा भाजपा शिवानी परदेशी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आदर्श यांनी रेखाटलेले हे चित्र अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असून लहान वयातही इतक्या बारकाईने भावपूर्णतेने आणि नेमकेपणाने साकारलेले ही कलाकृती असाधारण प्रतिभेची साक्ष देते.त्याने जोपासलेली ही कला अप्रतिम आहे.