धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य हॉलीबॉल महासंग्राम स्पर्धेत जेजुरी (पुणे) संघ विजेता; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण.

धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य हॉलीबॉल महासंग्राम स्पर्धेत जेजुरी (पुणे) संघ विजेता; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण.
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव (प्रतिनिधी) धाराशिव कळंबचे आमदार कैलास दादा पाटील यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य हॉलीबॉल महासंग्रामाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून विविध संघांनी सहभाग घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अंतिम सामन्यात जेजुरी, पुणे येथील संघाने शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले. डोरलेवाडी, बारामती संघाने द्वितीय क्रमांक, येडशी-धाराशिव (A) संघाने तृतीय क्रमांक, तर सोलापूर पोलीस, सोलापूर संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रवीण भैय्या कोकाटे, श्वेता दुर्गकर, सोमनाथ आप्पा गुरव, अमित उंबरे, प्रशांत बापू साळुंखे, हनुमंत देवकते, जाधवर सर, प्रवीण केसकर, राकेश सूर्यवंशी, शिवयोगी चपणे, अभिजीत देशमुख, सत्यजित पडवळ, विश्वजीत देशमुख, मनोज पडवळ, अक्षय खळदकर, सात्विक दंडनाईक, रोहन देशमुख आदींसह अनेक मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.युवासेना तालुका प्रमुख लखन बापू देशमुख व युवासेना शहर प्रमुख अभिराज कदम यांनी सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करत भविष्यात अशा क्रीडा स्पर्धांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बेडची येडशी-धाराशिव, घाटी, आदर्श, पोहनेर आणि जय जिजाऊ हॉलीबॉल क्लब या स्थानिक संघांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण महाराष्ट्रातून संघांनी हजेरी लावल्यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

#आमदारकैलासपाटील #खासदारओमराजेनिंबाळकर
#वाढदिवस

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक