"असा अधिकारी पुन्हा होणे नाही!"धाराशिवकरांच्या मनात कायम राहणारे नाव — डॉ. मैनाक घोष
"असा अधिकारी पुन्हा होणे नाही!"
धाराशिवकरांच्या मनात कायम राहणारे नाव — डॉ. मैनाक घोष
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव जिल्हा परिषदचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सदैव तत्पर असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची आता सांगली जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. सांगलीला मिळाले नवे जिल्हाधिकारी!
सांगली आणि धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासकीय बदल्या जाहीर!
धाराशिव जिल्हा परिषदेच्या नव्या CEO: मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा महाडदळकर (भाप्रसे) या असणार आहेत
धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
श्री. अशोक काकडे यांच्या जागी डॉ. घोष पदभार स्वीकारतील.
डॉ. घोष यांच्या रिक्त जागी श्रीमती प्रियंवदा महाडदळकर यांची धाराशिव CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने आज (२७ मार्च २०२६) हे अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत.
त्यांच्या कार्यकाळात पारदर्शक प्रशासन, जलद निर्णयक्षमता आणि जनतेशी थेट संवाद यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.
"स्वच्छ चारित्र्याचा अधिकारी" म्हणून त्यांची प्रतिमा केवळ प्रशासनातच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही निर्माण झाली.
धाराशिव जिल्ह्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील.
त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!