प्रा. मनोहरजी धोंडे यांची राज्यसभा किंवा विधानपरिषदेसाठी नियुक्ती करावी – वीरशैव लिंगायत व बहुजन समाजाची मागणी


प्रा. मनोहरजी धोंडे यांची राज्यसभा किंवा विधानपरिषदेसाठी नियुक्ती करावी – वीरशैव लिंगायत व बहुजन समाजाची मागणी
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव (प्रतिनिधी):
महाराष्ट्रासह देशभरातील बहुजन, वीरशैव-लिंगायत, ओबीसी, दलित, आदिवासी व सर्वसामान्य समाजाच्या भावना लक्षात घेऊन कर्तत्वान, चारित्र्यसंपन्न आणि शासनाच्या सर्व निकषात बसणाऱ्या प्रा. मनोहरजी धोंडे सर यांची राज्यसभा किंवा महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी वीरशैव लिंगायत व बहुजन समाजाच्या आणि शिवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात भारताच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
शिवा संघटनेच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भारतीय राज्यघटनेनुसार राज्यसभा व विधानपरिषदेसाठी अशा व्यक्तींना संधी दिली जाते ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय व निस्वार्थ योगदान दिले आहे. प्रा. मनोहरजी धोंडे सर हे या सर्व निकषांमध्ये परिपूर्ण बसणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
प्रा. मनोहर धोंडे सर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार” प्राप्त झाला असून त्यांच्या कार्याला शासनस्तरावर मान्यता मिळालेली आहे. ते गोल्ड मेडलिस्ट व आदर्श प्राध्यापक असून त्यांनी शिक्षण क्षेत्रातून समाजपरिवर्तनाचे कार्य केले आहे.
गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी कोणतेही पद नसताना निस्वार्थपणे सामाजिक कार्य करत विविध समाजघटकांसाठी न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. शिवा संघटनेच्या माध्यमातून देशभरात 5,000 पेक्षा अधिक शाखा स्थापन करून लाखो लोकांना संघटित करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रात 25 जातींना आरक्षण मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले असून विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी यशस्वी लढे दिले आहेत. महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा प्रसार करून त्यांच्या जयंतीला शासकीय मान्यता मिळवून देण्यातही त्यांनी भूमिका बजावली आहे.
राष्ट्रीय स्तरावर संसद भवनात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यात तसेच “अनुभव मंटप” ही जगातील पहिली लोकशाही असल्याचा विचार शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे.
त्याचबरोबर आर्थिक विकास महामंडळ, मोक्षधाम योजना, कपिलधार तीर्थक्षेत्र विकास यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. नांदेड–लातूर रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी त्यांनी पाठपुरावा करून, स्वखर्चाने न्यायालयीन लढालढुन हा मार्ग जनतेच्या कल्याणाचा व शासनाच्या कसा फायद्याचा आहे हे सिद्ध करून या मार्गाच्या मंजुरीला यश मिळवले आहे, यासह बहुजन व वीरशैव लिंगायत समाजाची शेकडो कामे त्यांनी सदनशील मार्गाने न्याय मिळवून बहुजन समाजाला न्याय आणि शासनाचे नुकसान न होऊ देता हित जोपासले आहे.
प्रा. मनोहर धोंडे सर हे निर्व्यसनी, निष्कलंक व चारित्र्यसंपन्न नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यामुळे ते जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहेत.
“प्रा. मनोहरजी धोंडे यांना राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेत संधी देणे म्हणजे सामाजिक न्यायाला बळ देणे व लोकशाही अधिक सक्षम करणे होय,” असे समाज बांधवांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
शेवटी, प्रा. मनोहरजी धोंडे सर यांची लवकरात लवकर राज्यसभा किंवा विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या, बहुजन आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
आपले विश्वासू
शिवा संघटना
तसेच देशभरातील समाज बांधव

समाधान प्रभू भोरे 
धाराशिव जिल्हा

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक